महाराष्ट्र
येलूर येथील पूजा गायकवाड यांचे वैद्यमापन अधिकारी ( ब गट) पदी निवड; येलूर ग्रामपंचायतींच्या वतीने सन्मान

पलूस : सांगली जिल्हा वाळवा तालुक्यातील येलूर येथील पूजा दीपक गायकवाड यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या वैद्यमापन अधिकारी ( ब गट) या परीक्षेत यश संपादन केले. या यशाबद्दल येलूर ग्रामपंचायतीच्या वतीने पूजा गायकवाड यांचा सत्कार, सन्मान करण्यात आला.
या वैद्यमापन अधिकारी परीक्षेत यश मिळवण्यासाठी त्यांना पती दीपक गायकवाड, महाराष्ट्र ॲकॅडमी चे संचालक अस्लम शिकलगार आणि केबीपी कॉलेजचे फिजिक्स विभागाचे प्रमुख प्राध्यापक शिंदे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
या अभिनंदनीय निवडीबद्दल पूजा गायकवाड यांचे येलूर ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातून त्यांचं कौतुक होत आहे.