हातकणंगले पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार रविकांत शिंदेला 16’000 रूपयांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने पकडले रंगेहाथ
कोल्हापूरः अनिल पाटील
तक्रारदार यांचे कुंभोज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे किराणा मालाचे दुकान आहे. तक्रारदार हे किराणा मालाचे दुकानात गुटखा विक्री करतात याकरिता हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रविकांत शिंदे यांनी तक्रारदार यांना साधारण एक महिन्यापूर्वी पोलीस ठाण्यात भेटण्यास बोलावून घेऊन तक्रारदार यांच्याकडे तुम्ही गुटखा विक्री करतात तुमच्यावर कायदेशीर कारवाई न करता गुटखा विक्री करायचे असेल तर मला प्रति महिना 10,000/- रुपये द्यावे लागतील नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करतो असे सांगितले. त्यानंतर दिनांक 15/10/2024 रोजी संध्याकाळी 04.45 वाजता 9421251635 या मोबाईल नंबर वरून तक्रारदार यांचे फोनवर फोन करून तक्रारदार यांना पोलीस ठाणे भेटण्यास बोलावे. तक्रारदार भेटण्यास गेले असता पोलीस हवालदार रविकांत शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे गुटखा विक्री करायचे असल्यास प्रति महिना 10,000/- रुपयाची मागणी करून तडजोडीअंती 4,000/- रुपये प्रति महिना प्रमाणे मागील चार महिन्याचे मिळून 16,000/- हजार रुपयाची तक्रारदार यांच्याकडे मागणी केल्याबाबत तक्रारदार यांनी इकडे कार्यालयाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस हवालदार रविकांत शिंदे यांचे लाच मागणीची पडताळणी केली असता पोलीस हवालदार रविकांत शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे 16,000/- रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पण झाले . तक्रारदार यांच्याकडे 16,000/-₹ ची मागणी केली मागणी केलेप्रमाणे आरोपी पोलीस हवालदार रविकांत शिंदेवय 50 पोलिस हवालदार बक्कल नं 1635 “”हातकणंगले पोलिस ठाणे— वर्ग—3 जि. कोल्हापूर रा. समीर मोरे यांच्या घरी भाङ्याने”पाच तिकटी हातकणंगले” मूळ गाव फणसवाङी ता. भूदरगङ जिल्हा कोल्हापूर यांनी तक्रारदार यांचेकडून 16,000/-रुपये स्वीकारताना त्यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून आरोपी यांचेविरुद्ध हातकणंगले पोलीस ठाणे, जि. कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही कारवाई- लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधिक श्रीमती वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बापु साळुंके पोलीस निरीक्षक
व सापळा पथक “”पो.ह.सुनील घोसाळकर,संदीप काशीद,पो.ना.सचिन पाटील,संदीप पवार,चा.कुराडे यांनी केली.