अंकलखोप, श्रीक्षेत्र औदुंबर येथे विविध विकासकामांचा शुभारंभ : आमदार डॉ विश्वजीत कदम, महेंद्र आप्पा लाड यांची उपस्थिती
श्री भुवनेश्वरी देवी, श्रीक्षेत्र औदुंबर (अंकलखोप) येथील श्री दत्त महाराजांचे मनोभावे दर्शन घेत सर्वांच्या सुखी, आरोग्यदायी जीवनासाठी केली प्रार्थना

भिलवडी: भुवनेश्वरवाडी येथील श्री भुवनेश्वरी देवी आणि श्रीक्षेत्र औदुंबर (अंकलखोप), ता. पलूस येथील श्री दत्त महाराजांचे मनोभावे दर्शन घेऊन माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सर्वांच्या सुखी व आरोग्यदायी जीवनासाठी प्रार्थना केली. तसेच अंकलखोप व श्रीक्षेत्र औदुंबर येथे विविध विकासकामांच्या शुभारंभ व लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहून ग्रामस्थांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला.
यावेळी ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण कार्यक्रमांतर्गत अंकलखोप ते रामरावनगर रस्त्याची सुधारणा करणे (३० लाख रुपये), पर्यटन विकासासाठी मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत श्रीक्षेत्र औदुंबर येथील श्री दत्त मंदिर परिसरात सुधारणा करणे (२५ लाख रुपये), मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत अंकलखोप ते रामरावनगर रस्ता भूमिपूजन (३ कोटी ७३ लाख ६३ हजार रुपये), अंकलखोप येथील म्हसोबा मंदिर परिसरात प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत रस्ता व भक्त निवास बांधकाम करणे (२ कोटी रुपये), आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत अंकलखोप येथे गहिनीनाथनगर ते कुराडे वस्ती रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करणे (१० लाख रुपये) आदी विविध विकासकामांचा समावेश आहे.
पलूस-कडेगाव मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून, आगामी काळातही विकासाची ही वाटचाल निरंतर सुरू राहील, अशी ग्वाही ग्रामस्थांना दिली. यावेळी नवरात्रोत्सवानिमित्त गावकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सांगली जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मा. महेंद्रअप्पा लाड, अंकलखोपच्या लोकनियुक्त सरपंच सौ. राजेश्वरी शशिकांत सावंत, उपसरपंच अभिजीत अनिल पाटील, भिलवडी चे माजी उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांच्यासह सर्व ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.