भिलवडी परिसरात भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांचा प्रचार : कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

भिलवडी: महायुतीचे काम तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी बांधली असून,भाजप महायुतीचे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारासाठी भाजप महायुतीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन भिलवडी परिसरात प्रचार करीत आहेत.
शासनाने आतापर्यंत राबवलेल्या योजना लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करीत आहेत.एकंदरीतच पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन्ही पक्षाचा प्रचार आपापल्या पद्धतीने धडाडीने सुरू असून, यामध्ये कोण बाजी मारणार? याकडे पलूस कडेगाव मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.भाजप कार्यकर्त्यांनी प्रचारात घेतलेला वेग, संग्रामसिंह देशमुख यांना मतदारांचा मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता संग्रामसिंह देशमुख यांचा विजय निश्चित होणार असा , विश्वास कार्यकर्त्यांना वाटत आहे.
तर काही भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा मतदारांशी प्रत्यक्ष भेट देऊन भाजप कार्याची माहिती देत आहोत.