देश विदेशमहाराष्ट्र
रतनजी टाटा यांच्या निधनामुळे कृष्णाई नवरात्र महोत्सव कार्यक्रमाच्या वेळेत बदत
कृष्णाई नवरात्र महोत्सव शुक्रवार, दि.११ रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार

पलूस ; जागतिक कीर्तीचे उद्योगपती, भारताचे थोर सुपुत्र रतनजी टाटा यांच्या निधनामुळे सारा देश शोकसागरात बुडाला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या दुःखद घटनेमुळे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आज गुरुवार, दि.१० ऑक्टोबर २०२४ रोजी सायं.५.३० वाजता *भारती विद्यापीठ शैक्षणिक परिसर, पलूस* येथे महिलांसाठी आयोजित केलेला
*कृष्णाई नवरात्र महोत्सव कार्यक्रमाच्या वेळेत बदत* केला असून आता
*शुक्रवार, दि.११ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वा.* होईल. कार्यक्रमाच्या तारखेत झालेल्या बदलाची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे..