टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियानांतर्गत भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील भिलवडी, माळवाडी ग्रामपंचायतींचा सत्कार
सांगली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडपिसे यांच्या हस्ते सन्मान

सांगली : टीबी मुक्त भारत| आरोग्य सार्वजनिक विभाग राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम | टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियान | अंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र भिलवडी अंतर्गत उपकेंद्र -भिलवडी स्टेशन अंतर्गत भिलवडी व माळवाडी गावांचा सत्कार मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडपिसे यांच्या हस्ते आज दिनांक 9/10/2024 रोजी डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग हॉल सांगली येथे करण्यात आला.
या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्र भिलवडी वैद्यकीय अधिकारी डॉ सोफिया शेख, समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक व आशा कार्यकर्ती व ग्रामपंचायत तर्फे मा सरपंच ,ग्रामसेवक यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भिलवडीच्या सरपंच स्मीता शेटे, ग्रामविकास अधिकारी कैलास केदारी, माजी उपसरपंच पृथ्वीराज पाटील, माळवाडीच्या सरपंच तांबोळी, भिलवडी आणि माळवाडी चे ग्रामपंचायत सदस्य इतर मान्यवर उपस्थित होते.