काँग्रेसच्या विचारांचे निष्ठावंत, स्वाभिमानी नेतृत्व उद्योगपती “सी. आर. सांगलीकर”

काँग्रेसचे दिवंगत नेते, तत्कालीन मुख्यमंत्री स्व.वसंतदादा पाटील, स्व. पतंगराव कदम, स्व. प्रकाशबापू पाटील, स्व. मदनभाऊ पाटील यांच्या विचारांच्या मुशीत घडलेले.. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेजी, जिल्ह्याचे नेते डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशालदादा पाटील, ज्येष्ठ नेत्या जयश्रीताई पाटील शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील, जिल्हाध्यक्ष विक्रमदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची विचारधारा घेऊन मागील तीन दशकांहून अधिक काळ राजकीय वाटचाल करणारे, काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचे सच्चे पाईक, काँग्रेसचे निष्ठावंत आणि स्वाभिमानी नेतृत्व म्हणजे उद्योगपती सी. आर. सांगलीकर..! काँग्रेस पक्षाचा एकेकाळी बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरज मतदार संघात सी. आर. सांगलीकर यांनी भरीव राजकीय, सामाजिक, औद्योगिक कार्य केले आहे. त्या माध्यमातून मिरज विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविणार आहेत. आज दिनांक 8 ऑक्टोबर रोजी त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा..
मिरजेतील युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी, रोजगार निर्मितीसाठी, उद्योग उभारणीसाठी प्रयत्नशील “आश्वासक” नेतृत्व..! मिरजेच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिक विकासाचा ध्यास बाळगणारे “उद्यमशील” नेतृत्व..! शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचे सर्वधर्म समभाव, धर्मनिरपेक्षता, समता, बंधुता या विचाराने राजकारण व समाजकारण करणारे “पुरोगामी” नेतृत्व..! मतदारसंघाच्या औद्योगिक, कृषी, सिंचन (पाणी) योजना, वैद्यकीय, रस्ते-दळणवळण, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कटिबद्ध “प्रगतीशील” नेतृत्व..! उद्योगपती सी. आर. सांगलीकर यांची अशी प्रतिमा त्यांच्या विचार व कार्यातून मिरज मतदारसंघातील जनसामान्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे.
सी. आर. सांगलीकर यांनी मिरजेत अथर्व गारमेंट्स आणि अथर्व निधी या संस्थांची उभारणी केली आहे. त्या माध्यमातून शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अथर्व निधीच्या द्वारे बचत गट तसेच उद्योजक महिलांना अर्थसहाय्य देऊन त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक उन्नती साधण्यासाठी हातभार लावला आहे. सांगलीतील बालाजी नगर येथे वाचनालय आणि स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राची उभारणी करून गरजू विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये प्रगतीची द्वारे खुली केली आहेत. आज पर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी येथील वाचनालय आणि अभ्यासिकेचा लाभ घेत त्यांच्या करिअरमध्ये उच्च पदे प्राप्त केली आहेत. विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके, शैक्षणिक साहित्य, निवास, भोजन अशी व्यवस्था सी. आर. सांगलीकर यांनी स्वतः लक्ष देऊन करून घेतली आहे. जत तालुक्यात शिक्षण संस्थेच्या उभारणीच्या माध्यमातून ग्रामीण तसेच सीमाभागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याची सोय त्यांनी केली आहे. सी. आर. सांगलीकर फाउंडेशनच्या माध्यमातून मिरज विधानसभा मतदारसंघातील शेकडो गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, शैक्षणिक साहित्य, सायकल वाटप व अन्य मदत देऊ केली आहे. त्याचा येथील विद्यार्थ्यांना मोठा लाभ झाला आहे. सी. आर. सांगलीकर फाउंडेशनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या या मदतीबद्दल मिरज मतदारसंघातील विद्यार्थी आणि पालक वर्गातून सी. आर. सांगलीकर यांच्या कार्याचे भरभरून कौतुक होत आहे.
जन्मगाव असलेल्या गुगवाड (ता.जत) येथे सी.आर सांगलीकर यांनी सुमारे २० एकर क्षेत्रामध्ये धम्मभूमी बौध्द विहारची निर्मिती
केली आहे. नागपूरची दिक्षाभूमी, मुंबईच्या चैत्यभूमीनंतर सर्वात मोठे बौध्द विहार म्हणून धम्मभूमीची ओळख निर्माण झाली आहे. एकाच व्यक्तीने स्वखर्चातून उभारलेले देशातील हे पहिलेच बौध्द विहार आहे. सन २०१३ मध्ये मिरजेतील क्रिडा संकुलमध्ये सी.आर सांगलीकर साहेब यांच्या पुढाकाराने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य रांगोळी साकारण्यात आली होती. मिरजेतील रांगोळीची विश्वविक्रमामध्ये नोंद घेतली गेली.________________________
मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन..मिरज मतदार संघात विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात राजकीय बांधणी करत असतानाच सी. आर. सांगलीकर यांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन ठेवले आहे. मिरजेच्या औद्योगिक वसाहतीमध्ये नवनवे उद्योग आणण्यासाठी, येथील उद्योगांच्या प्रगतीसाठी, त्यांना पायाभूत सुविधांची उपलब्धता करून देण्यासाठी, मिरजेतील शासकीय दूध डेरी सारखे बंद पडलेले उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी, किंवा त्यांना पर्यायी उद्योग या ठिकाणी उभारण्यासाठी, मतदार संघातील सर्वसामान्य कुटुंबातील युवक- युवती, महिला, विद्यार्थी यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी, वैद्यकीय केंद्र अशी ओळख असणाऱ्या मिरज शहरातील वैद्यकीय क्षेत्राच्या प्रगतीसाठी, त्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या नोकरी आणि व्यवसायिक संधीसाठी, शहरातील रस्ते, सांडपाणी, पाणीपुरवठा, उद्यान, क्रीडांगणे अशा पायाभूत सुविधांसाठी, मतदार संघातील शिक्षण संस्थांच्या विकासासाठी, जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी, ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी, मिरजेच्या ग्रामीण भागात गावोगावी उद्योगांचा विस्तार करण्यासाठी, ग्रामीण भागात नवे शेतीपूरक व अन्य उद्योग उभारण्यासाठी, त्या माध्यमातून गावातील तरुणांना स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध होण्यासाठी, महिला बचत गट व अन्य माध्यमातून महिलांसाठी गृह उद्योग आणि रोजगार संधी निर्माण करण्यासाठी, मिरज शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून शहरी तसेच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा बळकट करणे, त्याचा गरजू लोकांना अधिकाधिक लाभ होणे, ग्रामीण भागातील शेतीसाठी म्हैसाळ योजनेसारख्या सिंचन प्रकल्पांना गती देणे, म्हैसाळ योजनेपासून वंचित असलेल्या क्षेत्राला म्हैसाळ योजनेचे पाणी मिळणे, म्हैसाळ सारख्या सिंचन योजनांचे पाणी शेतकऱ्यांना वेळेत उपलब्ध होणे, मिरज पूर्व भागातील दंडोबा व गिरीलिंग अशा क्षेत्रातील पर्यटन विकास आणि पर्यावरण संवर्धनासाठी, ग्रामीण भागात कृषी पर्यटनासारख्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी सी. आर. सांगलीकर यांचे प्रयत्न सुरू आहेत.
___”____________________
काँग्रेसचे स्वाभिमानी निष्ठावंत पाईक..
उद्योगपती सी. आर. सांगलीकर हे मागील 30 वर्षांहून अधिक काळ काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सक्रिय आहेत. सन 2014 मध्ये देशात घडलेल्या राजकीय स्थित्यंतरानंतर अनेकांनी काँग्रेस पक्षाची साथ सोडली. मात्र महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सक्रिय असणारे सी. आर. सांगलीकर हे काँग्रेस सोबत निष्ठेने राहिले. मिरज विधानसभा मतदारसंघात सन 2009 व सन 2014 मध्ये काँग्रेस पक्षाकडे विधानसभा इच्छुकांची संख्या मोठी होती. मात्र सन 2014 नंतर अनेकांनी काँग्रेसची साथ सोडली. काँग्रेस पक्षातील अनेक इच्छुकांनी अन्य पक्षांमध्ये प्रवेश केला. अनेक जण सत्तेच्या वळचणीला जाऊन बसले. मात्र सी. आर. सांगलीकर हे काँग्रेस पक्षातच राहिले. काँग्रेस पक्ष, पक्षाची विचारधारा, पक्षाचे केंद्र आणि राज्यस्तरावरील नेते, जिल्ह्यातील नेत्यांसोबत खांद्याला खांदा लावून ते जनसामान्यांसाठी संघर्ष करीत राहिले. त्यामुळेच काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत, स्वाभिमानी पाईक म्हणुन त्यांना ओळखले जाते.सी. आर. सांगलीकर यांना मिरजेतील उमेदवारी देऊन काँग्रेस पाक्ष समस्त निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सन्मान करेल असावा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.