भिलवडी सार्वजनिक वाचनालयाची ८४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

भिलवडी
सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालयाची ८४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे होते.
वाचन चळवळ वृध्दींगत करण्यासाठी भिलवडी सार्वजनिक वाचनालय विविध उपक्रम सातत्याने राबविणार असल्याचे
प्रतिपादन गिरीश चितळे यांनी केले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल केंद्र सरकार,राज्य सरकार व या मागणीचा सातत्याने अभ्यासपूर्ण पाठपुरावा केल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेचा,संस्थेचे कार्याध्यक्ष
डॉ.मिलिंद जोशी व सर्व पदाधिकाऱ्यांचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात लेखा परिक्षकाची नेमणूक ,आर्थिक ताळेबंदास मान्यता देण्यात आली.
कार्यवाह सुभाष कवडे यांनी प्रास्तविक व स्वागत करून मागील सभेचे इतिवृत्त वाचून अहवाल वाचन केले.जयंत केळकर यांनी अंदाज पत्रकाचे वाचन केले.
डी.आर.कदम,हणमंत डिसले,संजय पाटील,हकीम तांबोळी,
भू.ना.मगदूम,शरद जाधव आदींनी आपल्या मनोगतामधून विविध सूचना मांडत वाचनालयाच्या सर्वोत्तम कामकाजाबद्दल पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
भू. ना.मगदूम यांनी पाच हजार रुपये,महादेव जोशी यांनी एक हजार रुपये तर रमेश गणपती पाटील यांनी ग्रंथ भेट दिली.यावेळी
विश्वस्त डॉ.भालचंद्र कुलकर्णी, जी.जी.पाटील,रघुनाथ देसाई,सदस्य जे.बी.चौगुले,रमेश सखाराम पाटील,बाळासाहेब पाटील,ए.के.चौगुले, डॉ.जयकुमार चोपडे,प्रदीप शेटे,संभाजी महिंद,ग्रंथपाल वामन काटीकर,विद्या निकम,मयुरी नलवडे,आदींसह सभासद उपस्थित होते.अशोक साठे यांनी आभार मानले.