पलूस कडेगांव तालुक्यासाठी उत्तम क्रीडा संकुल लवकरात लवकर होणे गरजेचे ; आमदार डॉ विश्वजीत कदम

पलूस : पलूस आणि कडेगांव तालुक्यातील क्रीडा संकुल समितीच्या सोबत आढावा बैठकीस माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी उपस्थिती दर्शविली.
या बैठकीस विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की,
पलूस-कडेगाव तालुक्यात कुस्तिसह इतर खेळांचा सराव करणारे उत्तम खेळाडू आहेत त्यांना सरावासाठी उत्तम क्रीडा संकुल लवकरात लवकर होणे गरजेचे आहे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे त्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. लवकरच अद्ययावत सोई सुविधांनी युक्त सुसज्ज असे क्रीडा संकुल अभे राहून तालुक्यातील खेळाडूंना याचा लाभ व्हावा यासंदर्भात सूचना केल्या. या दोन्ही तालुक्यातील खेळाडू देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तालुक्याचे नाव कमावतील अशी आशा आहे, असे आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले.या बैठकीस पलूसच्या तहसिलद्वार दिप्ती रिठे, प. स. पलूसचे गटविकास अधिकारी अरविंद माने, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. किरण बोरवडेकर, मा. महेंद्र (आप्पा) लाड, पलूस नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी निर्मला राशिवकर-यमगर, सार्वजनीक बांधकाम विभाग पलूसचे उपअभियंता मोहन पाटील, पलूसचे गटशिक्षण अधिकारी चव्हाण आर. वी., पलूस प्र. तालुका क्रीडा अधिकारी श्री. प्रशांत पवार, पोलीस निरीक्षक पलूस, श्री. रोहन गुरव तसेच प्रतिनिधी गटविकास अधिकारी, प. स., कडेगाव जालिंदर वाजे, प्रतिनिधी नगरपरिषद, कडेगाव शबनम पठाण, उपअभियंता सार्वजनीक बांधकाम, कडेगाव अविनाश पोळ, गटशिक्षण अधिकारी, कडेगाव श्री ज्ञानेखर चिमटे, प्र. तालुका क्रीडा अधिकारी, कडेगाव श्री. पारस पाटील, पोलीस निरीक्षक कडेगाव व इतर मान्यवर उपस्थित होते.