महाराष्ट्र
सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे महात्मा गांधीजी, लाल बहादूर शास्त्रीजी यांना अभिवादन
उद्योगपती गिरीश चितळे यांची उपस्थिती ; वाचकांचा सहभाग

भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्रीजी यांची जयंती साजरी करण्यात आली.
वाचनालयाचे अध्यक्ष माननीय गिरीश चितळे यांचे हस्ते फोटोज पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यवाह सुभाष कवडे यांनी स्वागत प्रास्ताविक केले यावेळी विश्वस्त जीजी पाटील संचालक श्री डी आर कदम जयंत केळकर हनुमंतराव डिसले सर्व वाचक ग्रंथपाल वामन काटीकर सौ विद्या निकम मयुरी नलवडे माधव काटीकर व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी कुमारी वेदश्री अविनाश निकम हिने इंग्रजी मध्ये महात्मा गांधीजींच्या जीवन कार्याविषयी भाषण केले.
सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे होत असलेल्या विविध उपक्रमांचे लोकांतून कौतुक होत आहे.