श्री क्षेत्र कोळे नरसिंहपूर येथे श्री लक्ष्मी नृसिंह जयंती महोत्सव २०२५ ला प्रारंभ
कोल्हापूरच्या श्री ब्रह्मचैतन्य ग्रुपची महोत्सवात गानसेवा

दर्पण न्यूज वाळवा तालुका प्रतिनिधी -: महाराष्ट्रातील भक्तगणांचे कुलदैवत व जागृत देवस्थान असलेल्या श्री क्षेत्र ज्वाला नृसिंह तीर्थ,कोळे नरसिंहपूर ता.वाळवा जि.सांगली येथे दि.४मे ते १३मे२०२५अखेर असलेल्याश्री लक्ष्मी नृसिंह जयंती महोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला.या महोत्सवात श्रीं ची पूजाअर्चा ,अभिषेक आरती बरोबर ह.भ.प.शरदबुवा घाग यांची किर्तन सेवा,वेद संहिता पारायण, भजन,किर्तन सेवेचे आयोजन केले असून श्री शंकराचार्य स्वामी,संकेश्वर यांचे हस्ते श्री नृसिंह देव स्त्रोत्र पुस्तीकेचे प्रकाशन दि.११मे रोजी करण्यात येणार आहे.दि.१२मे रोजी महाप्रसाद, कृष्णामाई पूजा आरती, हळदीकुंकू,दीपोत्सवाचे आयोजन केले असून दि.१३मे रोजी श्रीं ची पालखी ग्रामप्रदक्षिणा इत्यादीं होणार आहे.संपूर्ण मंदीर परीसर दीपमाळांनी सजवणेत आले असून परीसराची स्वच्छता करणेत आली आहे.या महोत्सवात कोल्हापूर येथील श्री ब्रम्हचैतन्य ग्रुपचे वतीने दि.८मे रोजी गानसेवेचा कार्यक्रम झाला.यात ग्रुपचे अभय नेर्लेकर,स्नेहा मुणगेकर,प्रकाश पत्की,संजय शिरोळकर,माधुरी पेंडसे या कलाकारांनी संत एकनाथ,संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम यांचे अभंगासह कवि जगदीश खेबुडकर, गदीमा,प्रवीण दवणे आदींच्या रचना कराओके ट्रँकवर सादर करुन उपस्थित रसिक भाविकांना खिळवून ठेवले.पहलगाम येथे अतिरेक्यांच्या भ्याड हल्यात जीव गमावलेल्या हिंदूं पर्यटकांना कार्यक्रमाचे सुरवातीला श्रध्दांजली वाहणेत आली.गानसेवेतील कलाकारांचा सत्कार श्री. शाम काका कुलकर्णी यांचे हस्ते श्रीफळ,स्मृतिचिन्ह देवून करण्यात आला
या संपूर्ण जयंती महोत्सवाचे आयोजन देवस्थान समितीचे विश्वस्त श्री.दिलीप कुलकर्णी,संदीप कुलकर्णी,प्रदीप कुलकर्णी ,सुहास कुलकर्णी ,सुनिल कुलकर्णी आदी मान्यवर, कुटुंबीय ,आप्त मित्र तसेच परिसरातील रहिवासी यांनी केले.