महाराष्ट्र

लोकनेते जे के बापू जाधव यांच्या नेतृत्वाखाली दुधोंडी गावातून “लोकतीर्थ” साठी जय्यत तयारी : हजारो लोक सहभागी होणार

कडेगांव येथील लोकतीर्थ येथे माजी मंत्री कै डॉ पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व स्मारक लोकार्पण सोहळा

दुधोंडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील दुधोंडी येथून कडेगांव येथील लोकतीर्थ येथे माजी मंत्री कै डॉ पतंगराव कदम साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व स्मारक लोकार्पण सोहळ्यासाठी लोकनेते जे के बापू जाधव यांच्या नेतृत्वाखाली दुधोंडी गावातून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी महिला – पुरुषांसह हजारोंच्या संख्येने लोकांचा सहभाग असणार आहे.

नेहमीच कोणताही कार्यक्रम असो यासाठी तणांनी मनाने धडपडणारे लोकनेते जे के बापू जाधव यांच्या नेतृत्वाखाली कडेगांव येथील स्वर्गीय डॉ पतंगरावजी कदम साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व स्मारक लोकार्पण सोहळ्यासाठी यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. गेल्या काही दिवसापासून या कार्यक्रमासाठी लोकनेते जेके बापू जाधव यांनी दुधोंडी गावातील महिलांसाठी विशेष आयकार्ड ची व्यवस्था करण्यात आली तर एसटी बसेसवरही दुधोंडी गावातील ग्रामदैवतांची फोटो प्रतिमा ची पोस्टर लावण्यात येणार आहेत या संकल्पामुळे महिलांसाठी चांगली सोय होणार आहे. ‌

याबाबत जे के बापू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दुधोंडी येथे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची विशेष बैठक घेऊन त्यांना सूचना देण्यात आल्या. दूधोंडी गावातून जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आपण काटेकोरपणे सोय करणार असून त्या लोकार्पण सोहळ्या दिवशी कुणाचीही गैरसोय करता कामा नये ज्या पद्धतीने आपण त्यांना घेऊन जातो त्या पद्धतीने आपण त्यांना घरी आणून सोडायचे आहे ही आपली जबाबदारी आहे आपली माणसं या भावनेतून आपण सर्वांनी काम करायचे आहे असा आदेशही जे के बापू जाधव यांनी दिला.
या बैठकीच्या वेळी मानसिंग बँकेचे चेअरमन सुधीर भैय्या जाधव, दुधोंडी गावचे ग्रामपंचायत सदस्य व विविध संस्थेतील पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!