महाराष्ट्रक्रीडा

पुण्याची उन्नती खिलारे ठरली नॅशनल चॅम्पियनशिपची विजेती

अनेकांकडून होत आहे कौतुक ; पालकांचेही अभिनंदन

 

 

पुणे प्रतिनिधी :

पुण्याची उन्नती खिलारे ठरली नॅशनल चॅम्पियनशिपची विजेती ठरली आहे. यामुळे तिचे कौतुक होत आहे.
मुलुंड या ठिकाणी प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे एक सप्टेंबर रोजी ऑल इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप आणि फुनाकोशी इंडिपेंडेंस कप 2024 ही स्पर्धा घेण्यात आली होती. शनिवार पेठ पुणे या ठिकाणी राहत असणारी उन्नती शिवाजी खिलारे या स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती. या स्पर्धेमध्ये दोन विभाग होते. पहिला विभाग होता तो कात्ता यामध्ये तिला ब्रांच मेडल मिळाले दुसरा विभाग होता तो म्हणजे फाईट यामध्ये तिने तीन राउंड खेळत गोल्ड मेडल मिळवले .

नॅशनल चॅम्पियनशिप साठी सज्ज झाली. चौथ्या राऊंड मध्ये खेळुन ती नॅशनल चॅम्पियनशिप ची विजेती झाली . या स्पर्धेसाठी तिच्या पालकांचा सपोर्ट तिला होता. त्याचप्रमाणे स्पार्टन स्पोर्ट्स अकॅडमी चे श्रीकांत पवार सर यांचेही तिला मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्याचप्रमाणे हुजूरपाक चे  तिचे शिक्षक यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन मिळाले. उन्नती सध्या इ यत्ता ३ री मध्ये शिकत आहे. या स्पर्धेत सहभागी होऊन विजेतेपद पटकावले, यामुळे उन्नती खिलारे हिच्यावर  अनेकांकडून कौतुक होत आहे. तसेच अभिनंदनाचा वर्षाव केला जातो आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!