आनंदराव भाऊ मोहिते यांच्या सारखा एक सच्चा काँग्रेस प्रेमी हरपला ; माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम
भिलवडी येथे कै आनंदराव भाऊ मोहिते यांना अनेकांकडून भावपूर्ण आदरांजली ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

भिलवडी; सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील माजी सहकार मंत्री कै डॉ पतंगरावजी कदम साहेब यांचे अत्यंत विश्वासू सहकारी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष , काँग्रेस पक्षाचा सच्चा नेता ज्येष्ठ नेते आनंदराव भाऊ मोहिते यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली, पतंगरावजी कदम साहेब यांच्या वर अत्यंत निष्ठेने प्रेम करणारे आनंदराव भाऊ आपल्यातून निघून गेले ही मोठी दुःखद घटना आहे, अशी भावना माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी व्यक्त केली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आनंदराव भाऊ मोहिते यांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड, चितळे उद्योग समूहाचे उद्योगपती गिरीश चितळे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मानसिंग को-ऑपरेट बँकेचे संस्थापक अध्यक्ष जे के बापू जाधव, उद्योजक सतीश आबा पाटील, विविध गावांतील सरपंच, उपसरपंच, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते , ग्रामस्थ उपस्थित होते.