भिलवडी येथील सेकंडरी स्कूलमध्ये पत्रकार दिन साजरा ; पत्रकारांचा सत्कार

भिलवडी : ‘दर्पण ‘ हे पहिले वृत्तपत्र सुरू करणारे ‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती ‘पत्रकार दिन ‘म्हणून भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सुरुवातीला ‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे संचालक महावीर वठारे ,सचिव मानसिंग हाके, मुख्याध्यापक संजय मोरे ,उप मुख्याध्यापक विजय तेली व सर्व पत्रकार बांधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रमणी रांजणे, घनश्याम मोरे, शरद जाधव या पत्रकार बांधवांनी आपले विचार व्यक्त केले .निस्पृह, निरपेक्ष निर्भीड व रोखठोक वृत्तांकन करण्यासाठी पत्रकारांची गरज आहे. समाजातल्या तळागाळातील लोकांच्या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी व चांगल्या कामांची लोकांना माहिती करून देणे या हेतूने लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसार माध्यमे काम करत असतात आणि यासाठी समाजातील सामान्यांचे विचार व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून प्रसार माध्यमे असतात. यासाठी पत्रकार बंधू कष्ट , प्रयत्न करत असतात. म्हणून त्यांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने संचालक महावीर वठारे, सचिव मानसिंग हाके, मुख्याध्यापक संजय मोरे, उप मुख्याध्यापक विजय तेली यांच्या हस्ते श्रीफळ ,वस्त्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाला घनश्याम मोरे,दै. तरुण भारत ,भाऊसाहेब रूप टक्के ,द.जनशक्ती न्यूज ,शशिकांत राजवंत, क्रांतीसुर्य न्यूज, पंकज गाडे, दै. बंधुता, शरद जाधव ,संवाद न्यूज, चंद्रमणी रांजणे, दै. जनप्रवास, विशाल कांबळे, विश्वसंवाद न्यूज ,जमीर संदे, पलूस एक्सप्रेस न्युज, प्रमोद काकडे, विवेक वार्ता चे पत्रकार, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर सेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.