महाराष्ट्र

मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्यास 16 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ : सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर

 

         सांगली  वय वर्षे 65 व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपायोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/ उपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीव्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास शासनाकडुन मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यास त्याच्या आधारसंलग्न खात्यावर तीन हजार रूपये एकदाच वर्ग करण्यात येणार आहेत.                 या योजनेचे अर्ज दि. 7 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करण्याबाबत मुदत देण्यात आली होती. तथापि जेष्ठ नागरीकांना ग्रामपातळीवर / तालुकास्तरावर अर्ज करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता अर्ज करण्यास दि. 16 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी दिली.

         अर्जासोबत विहीत स्वघोषणापत्रे, आधार कार्ड झेरॉक्स, उपकरण हवे असल्याबाबतचे वैद्यकिय प्रमाणपत्र, जन्म तारखेचा पुरावा, दोन फोटो, बँक पासबुक झेरॉक्स, उत्पन्नाचा पुरावा जोडणे आवश्यक आहे. अर्ज विनामुल्य असून ते आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, समाज कल्याण कार्यालय सांगली यांचेकडून उपलब्ध करुन घ्यावेत व परिपुर्ण अर्ज त्यांचेकडेच विहित मुदतीत सादर करावेत. या योजनेचा सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. चाचरकर यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!