भिलवडी, माळवाडी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
अनेक दिग्गज नेत्यांनी केले अभिवादन

भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी, माळवाडी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती विविध उपक्रमांनी उत्साह साजरी करण्यात आली.
भिलवडी येथील भिलवडी ग्रामपंचायत भिलवडीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले तसेच माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या जनसंपर्क कार्यालयात ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर साठे नगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बी डी पाटील सर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे एका जाती-धर्माचे नव्हते तर ते देशाचे आणि महाराष्ट्राचे लोकहिताचे प्रतीक होते. त्यांच्या लेखणीतून त्यांनी महाराष्ट्राच्या डाव्या आघाडीच्या वर्गामध्ये मोठी क्रांती केली आहे. आजच्या तरुणांनी त्यांच्या विचारांचा वारसा जपला पाहिजे, असेही पाटील यांनी सांगितले.
यावेळी सतीश आबा पाटील यांनी सांगितले ,की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी भारतरत्न डॉ भीमराव आंबेडकर यांना आपले गुरु मानले होते. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून शेतकरी, शोषितांच्या दुःखाच्या वेदना लोकांसमोर सादर केल्या. परदेशातही त्यांनी भारताचे नाव उंचावले होते, असे त्यांनी सांगितले.
पलूस पंचायत समितीचे बीडोओ अरविंद माने, माजी उपसरपंच बाळासो मोरे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले.
या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी सर्कल सुनिता जाधव, ग्रामसेवक कैलास केदारी, तलाठी गौसमहंमद लांडगे,
भिलवडी गावच्या सरपंच विद्याताई पाटील, माजी सरपंच सविता महिंद पाटील , पांडुरंग टकले, माजी उपसरपंच मोहन नाना तावदर , चंद्रकांत पाटील, युवा नेते उद्योजक सतीश आबा पाटील, उंडे सर, सामाजिक कार्यकर्ते राहुल कांबळे, बाळासो महिंद पाटील, भिलवडी येथील आमदार डॉ विश्वजीत कदम जनसंपर्क कार्यालयाचे सुहास अरबुणे ,संतोष मगदूम भिलवडी ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार अभिजीत रांजणे, घनश्याम मोरे, ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.