महाराष्ट्र
भिलवडी कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ ; नागरिकांत घबराट
घाबरून जाऊ नका ; अलमट्टी धरणातून विसर्ग जादा सुरू

भिलवडी; सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी कृष्णा नदीच्या पाणी पत्रामध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत दिल्यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक स्थिती निर्माण झाली होती. परंतु आज बुधवार दिनांक 31 जुलै रोजी दहा वाजल्यापासून आज आठ वाजेपर्यंत झालेल्या पाणी पातळीत झपाटीच्या वाढीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रशासकीय अधिकारी पद्तीसाठी सज्ज आहेत घाबरून जाऊ नका ; अलमट्टी धरणातून विसर्ग जादा सुरू आहे . भरवसा ठेवा, घाबरण्याचे अजिबात कारण नाही, असे तज्ञ लोकांकडून सांगण्यात आले आहे.