क्राईममहाराष्ट्र

पन्हाळा तालुक्यातील वाङी रत्नागिरी येथील तलाठी रमेश वळीवङेकर याला 25 हजारांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने पकङले रंगेहाथ

 

 

 

 

कोल्हापूरः अनिल  पाटील

तक्रारदार याची गिरोली, ता. पन्हाळा येथील शेतात बोअरवेल मारायची होती. बोर मारण्याची गाडी जड असल्याने ती रूतु नये म्हणुन, शेतात जाणेकरीता शेतीच्या बाजुला गायरान रस्ता व्यवस्थीत नसल्याने, तात्पुरता रस्ता करण्याकरीता तक्रारदार यांचे परिचयाचे व्यक्तीचे जेसीबीने खडी पसरवत असताना, त्यावेळी तेथे तलाठी वळीवडेकर हे आले, तक्रारदार यांना परवानगी न घेता काम का करता असे म्हणुन त्यांनी या ठिकाणचा पंचनामा करून जेसीबी ताब्यात घेतला. त्यानंतर त्यांनी मला जेसीबी सोडवायचा असेल व पुढील कारवाई टाळायाची असेल तर ५०,०००/-रूपये दयावे लागतील असे म्हणुन ५०,०००/- रूपयांची लाच मागणी केली त्यानंतर तक्रारदार यांनी अॅन्टी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे तक्रार दिलेली होती.
अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर येथे दिलेल्या तक्रार अर्जाप्रमाणे पडताळणी केली असता पडताळणी मध्ये तक्रारदार यांचे शेतामध्ये बोअरची गाडी जाणेसाठी जेसीबीच्या साहयाने गायरानात खडी पसरत असताना तलाठी वळीवडेकर यांनी तेथे येवुन पंचनामा करून जेसीबी जप्त केला होता. तो जेसीबी सोडविण्याकरीता व तक्रारदार यांचेवर पुढील कारवाई टाळणेकरीता तलाठी वळीवडेकर यांनी तक्रारदार यांचेकडे ३०,०००/-रू लाचेची मागणी करून तडजोडअंती २५०००/-रू लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत तक्रारदार यांनी आरोपी लोकसेवक रमेश मुरलीधर वळीवडेकर, तलाठी सज्जा वाडी रत्नागिरी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर यांचेविरूध्द दिले फिर्यादीवरून त्याचेविरूध्द कोडोली पोलीस ठाणे, जि. कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करणेचर प्रक्रिया चालु आहे.
ही कारवाई शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे. श्री. विजय चौधरी, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे, वैष्णवी सुरेश पाटील, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. कोल्हापूर, यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक बापू सांळूके, सहा. फौ सुनिल मोरे, पो.हे. कॉ. सुनिल घोसाळकर, पो.ना. सुधिर पाटील, पोकों सदिप पवार वा. सहा. फौ गजानन कुराडे अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर यांनी केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!