घाबरून जाऊ नका, मदत लागल्यास हाक द्या : केमिस्ट संघटना
पलूस तालुक्यातील पूर रेषेतील केमिस्ट सभासदांच्या दालनाची केमिस्ट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून पाहणी .

भिलवडी : पलूस तालुक्यातील पूर रेषेतील केमिस्ट सभासदांच्या दालनाची केमिस्ट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिनांक 26 जुलै 2024 रोजी पाहणी केली .तसेच घाबरून जाऊ नका, मदत लागल्यास हाक द्या , असे ही पदाधिकारी यांनी सांगितले.
यावेळी केमिस्ट संघटनेचे सर्वेसर्वा मा.विजय भाऊ पाटील मा. जिल्हाध्यक्ष भरत सावंत तसेच सहसचिव प्रकाश सूर्यवंशी झोन संचालक मा. अनिल देशमुखे खानापूरचे सेक्रेटरी अमित कोळी पलूस तालुका अध्यक्ष संदीप पाटील सचिव अमित जाधव. जयकर पाटील शहराध्यक्ष किरण पोतदार कार्याध्यक्ष सचिन नावडे. शुभम. यांनी पलूस तालुक्यातील पूर रेषेतील केमिस्ट सभासदांना पुरामुळे होणाऱ्या नुकसानीची आढावा घेतला . तसेच त्यांचे पुरामुळे नुकसान होऊ नये म्हणून दुकानातील औषधे सुरक्षित ठिकाणीहलवण्यास सूचना दिल्या. तसेच सभासदांना रात्री अपरात्री काही मदत लागल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच स्वतःची व कुटुंबाचे काळजी घेण्यासही सांगितले.