साने गुरुजी संस्कार केंद्र भिलवडी संस्थेचा 24 वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा
श्रीमती सुनिता चितळे, उद्योगपती गिरीश चितळे यांची उपस्थिती

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील साने गुरुजी संस्कार केंद्र भिलवडी या संस्थेचा 24 वा वर्धापन दिन समारंभ विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती सुनिता चितळे वहिनी होत्या .प्रमुख पाहुणे म्हणून माननीय महावीर वठारे गुरुजी, उद्योगपती गिरीश चितळे उपस्थित होते. प्रारंभिक साने गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर खरा तो एकची धर्म ही प्रार्थना सामुदायिक रित्या म्हणण्यात आली. केंद्रप्रमुख सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून वाचनालयाच्या संस्कार केंद्राच्या विविध उपक्रमांचा विस्ताराने आढावा घेतला व रौप्य महोत्सवी वर्षात करावयाच्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी पालवी शेटे अनन्या घोडके ,अमेय नलवडे, तनुजा सपकाळ, समीक्षा पाटील, सुयश निकम या विद्यार्थ्यांना वाचन स्पर्धेतील बक्षिसे प्रमाणपत्र व पुस्तके भेट देण्यात आली, सुनीता चितळे वहिनी यांचे हस्ते वैष्णवी सुरेश वावरे प्रथमेश वावरे तेजस्विनी अमोल कांबळे या विद्यार्थ्यांना यावर्षीची साने गुरुजी शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली, महावीर वठारे यांचे हस्ते विद्यार्थ्यांना मोफत वह्यायांचे वाटप करण्यात आले.
यावेळी गिरीश चितळे म्हणाले, साने गुरुजी संस्कार केंद्राने जिल्ह्यामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे या संस्कार केंद्रास मी नेहमी सर्व प्रकारचे सहकार्य करीन.
महावीर वठारे गुरुजी म्हणाले सुभाष कवडे यांनी मोठ्या जिद्दीने व सातत्याने विद्यार्थ्यांना घडविण्याचे संस्कार करण्याचे काम केले आहे यावेळी वठारे गुरुजी यांनी साने गुरुजींच्या कार्याचा व साहित्याचा परिचय करून दिला.
श्रीमती सुनिता चितळे वहिनी म्हणाल्या या संस्कार केंद्राचा लाभ जे विद्यार्थी घेतील ते विद्यार्थी भविष्यकाळात नक्कीच आदर्श नागरिक बनतील सुभाष कवडे सर सेवानिवृत्तीनंतर जे संस्कार पेरणीचे कार्य करीत आहेत ते समाज उपयोगी असून सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
यावेळी हरा जोशी यांनी बालकथा व कविता सादर केल्या. संस्कार कलश उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
बाळासाहेब माने यांनी आभार मानले. यावेळी दिव्यांग असून देखील दिव्यांगासाठी सातत्याने कार्य करणारे संजय चौगुले यांचा ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप हनुमंतराव डिसले यांच्याकडून करण्यात आला.
समारंभास पत्रकार अभिजीत रांजणे, डी आर कदम, रमेश चोपडे, प्रमोद कुलकर्णी मेजर उत्तम कांबळे आदी उपस्थित होते.संस्कार कलश उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.