दुधोंडी येथे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र (आप्पा) लाड यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ
आमदार मा विश्वजीत कदम यांच्या आमदार फंडामधून १५ लाख व १० लाख रुपयांचा निधी दूधोंडीचे ग्रामदैवत श्री हनुमान,श्री महादेव व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बांधकामास मंजूर : नागरिकांमध्ये समाधान

दुधोंडी : महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व कृषी राज्यमंत्री तसेच पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मा विश्वजीत ऊर्फ बाळासाहेब कदम यांनी आमदार फंडामधून १५ लाख व १० लाख रुपये एवढा निधी दूधोंडीचे ग्रामदैवत श्री हनुमान,श्री महादेव व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बांधकामाच्या बांधकामासाठी देण्यात आले . या मंदिराच्या बांधकामाच्या भूमिपूजनाचा शुभारंभ रोजी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. महेंद्र (आप्पा) लाड यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मानसिंग को ऑप बँकेचे चेअरमन मा. सुधीर (भैय्या) जाधव, मा. जयवंत (आबा) मगर पाटील, मा. जयप्रकाश (भाऊ) साळुंखे व दुधोंडी ग्रामपंचायतचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच मा. सौ. उषाताई देशमुख या सर्वांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला यावेळी दूधोंडी गावातील नेते, तसेच सर्व संस्थांचे पदाधिकारी व प्रमुख मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.