भिलवडी येथील उत्तर भाग सोसायटीच्या चेअरमनपदी रमेश पाटील यांची तर व्हाईस चेअरमन पदी राजेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील उत्तर भाग विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी रमेश गणपती पाटील यांची तर व्हाईस चेअरमन पदी राजेंद्र भीमराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक पलूसचे विनय पाटील यांनी काम पाहिले. उत्तर भाग सोसायटीचे सचिव आदिनाथ साईमोते यांनीही मोलाची मदत केली.या निवडी वेळी भिलवडी गावचे माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम दादा पाटील, माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील, बाळासाहेब मोरे, मोहन नाना तावदर,
माजी सरपंच पांडुरंग टकले, मोहन पाटील सर, विजय पाटील, बाबासाहेब मोहिते, वसंत पाटील, गुणधर मगदूम, आण्णा शेटे, दिलीप पाटील, कपील शेटे, सनी यादव, शरद पाटील, रमेश पाटील, अनिल कारंडे, प्रताप पाटील, जितेंद्र पाटील, बाळासाहेब शिंदे, सर्जेराव वावरे, कुसुम पाटील, मृणाली पाटील, लक्ष्मण पुजारी पत्रकार, सभासद, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी रमेश पाटील आणि राजेंद्र पाटील यांचा अनेक लोकांनी सत्कार केला.
उत्तर भाग विकास सोसायटी नेहमीच ग्राहकांच्या आणि सभासदांच्या हिताचे काम करत असते. यापुढेही चेअरमन या नात्याने मी सोसायटीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तत्पर असेल, असे आश्वासन चेअरमन रमेश पाटील यांनी दिले.