महाराष्ट्रकृषी व व्यापार

प्राथमिक दूध संस्‍थांनी म्हैस दूध वाढीसाठी प्रयत्नशील राहावे : चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांचे आवाहन

 

कोल्हापूरः अनिल पाटील

शिरोळ तालुक्यातील नवीन नोंदणी झालेल्या १३ प्राथमिक दूध संस्थांना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, सदस्य यांच्या उपस्थितीत गोकुळच्या ताराबाई पार्क, कार्यालय येथे संपन्न झाला.

यावेळी बोलताना चेअरमन अरुणकूमार डोंगळे म्हणाले कि, गोकुळने प्राथमिक दूध संस्‍था व दूध उत्‍पादक केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताचा कारभार केला असुन प्राथमिक दूध संस्‍था पदाधिका-यांनी संस्था व दूध उत्‍पादकांचे हित समोर ठेवून कारभार करावा. तसेच संघाच्या विविध योजना सेवासुविधांचा दूध उत्पादकांनी लाभ घेऊन संघाच्या म्हैस दूध वाढीसाठी दूध संस्थांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले.

यावेळी गोकुळचे चेअरमन अरुणकूमार डोंगळे यांचा सत्कार नूतन दूध संस्था प्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी गोकुळचे चेअरमन अरुणकूमार डोंगळे, सागर माने (कवठेसार), प्रदीप उलागडे (अकिवाड) सचिन पाटील (दोनोळी), शक्ती पाटील (उदगाव), सागर हेरवाड (तेरवाड), सुनिल आळते (दत्तवाड), राजेश खोत (शिवनाकवाडी), सुरेश सावंत (चिंचवाड) व गोकुळचे सहा.दूध संकलन अधिकारी मुकुंद पाटील, सिनी.विस्तार सुपरवायझर सुहास डोंगळे तसेच विविध दूध संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!