महाराष्ट्रकृषी व व्यापार

नागठाणे येथे कृषी संजीवनी कार्यक्रम उत्साहात

महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय पलूस यांचेमार्फत कृषी संजीवनी पंधरवडा निमित्त आयोजन

 

पलूस : मौजे नागठाणे तालुका पलूस येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय पलूस यांचेमार्फत कृषी संजीवनी पंधरवडा निमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराज ग्रामसचिवालय येथे कृषी विभागाच्या वतीने कृषी संजीवनी पंधरवड्याची आयोजन गावचे सरपंच विजय माने यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. कृषी विभागाच्या वतीने कृषी पर्यवेक्षक उदय दौंड यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक संतोष चव्हाण यांनी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असलेल्या कृषी विषयक योजनांची सविस्तर माहिती सांगितली तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य व उन्नयन योजनेच्या डीआरपी सौ शुभांगी शिंदे यांनी सदर योजनेअंतर्गत कृषी संलग्न उद्योग व व्यवसाय याबाबत सखोल माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रारंभी सरपंच विजय माने यांनी कृषी विभागाचे अधिकारी व उपस्थिताचे स्वागत केले. या कार्यक्रमासाठी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व महिला शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार ग्रामविकास अधिकारी विलास चव्हाण यांनी मानले.
या कार्यक्रमास सरपंच विजय माने कृषी पर्यवेक्षक उदय दौंड कृषी सहाय्यक संतोष चव्हाण सर्व ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!