महाराष्ट्र

रामानंदनगर येथील रयत शिक्षण संस्थेकडून डॉ. पतंगराव महाविद्यालयास 50 लाखाचा निधी.

लोकनेते जे के बापू जाधव यांचे मोठे योगदान

 

पलूस ; रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर या कॉलेज ला NAAC पुनर्मुल्यांकनाच्या अनुषंगाने भौतिक व शैक्षणिक सुविधा निर्माण करून चांगली ग्रेड प्राप्त करण्यासाठी निधी देण्यात आला.
महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व कृषी राज्यमंत्री व पलूस कडेगाव विधानसभेचे विद्यमान आमदार विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र (आप्पा) लाड, कृष्णाकाठ ऊद्योग समूहाचे संस्थापक व मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य जे.के (बापू) जाधव यांच्या विशेष प्रयत्नाने रामानंदनगर येथील रयत शिक्षण संस्थेकडून डॉ पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर या महाविद्यालयास पन्नास लाखाचा निधी देण्यात आला.
महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन आमदार विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम यांनी रयत शिक्षण संस्थेला दिलेल्या एक कोटी रुपयांच्या देणगी मधून रुपये 50 लाखाचा धनादेश रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य जे के (बापू) जाधव व प्र. प्राचार्या डॉ. यु. व्ही.पाटील यांच्याकडे सुपूर्त केला.
रयत शिक्षण संस्थेचे सचिव देशमुख यानी चेक देताना म्हणाले की महाविद्यालयाने आपला “अ” मानांकन दर्जा सिद्ध केलेला आहे, यापुढेही त्यांनी “अ” मानांकन प्राप्त करावे यासाठी शुभेच्छा ही दिल्या.
चेक स्वीकारताना रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, के. बी.पी. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.ज्ञानदेव मस्के, ऑडिटर शिवलिंग मेनकुदळे, माध्यमिक सहसचिव बी. एन. पवार,सहाय्यक विभागीय अधिकारी अँथनी डिसोजा,प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे, प्राचार्या डॉ. यु. व्ही. पाटील, महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!