चितळे उद्योग समूहाचे उद्योगपती.मकरंद चितळे यांचेकडून भिलवडी सार्वजनिक वाचनालयास एक लाखाची देणगी

भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी चितळे उद्योग समुहाचे संचालक व भिलवडी वाचनालयाचे आजिव सभासद उद्योगपती.मकरंद चितळे यांनी सार्वजनिक वाचनालय भिलवडी या संस्थेस एक लाख (रु.१००,०००)रुपयांची देणगी दिली . या बहुमोल देणगी बद्दल वाचनालयाच्या वतीनेग्रंथ भेट देऊनत्यांचा सत्कार करण्यात आला. विश्वस्त जी.जी.पाटील यांनी देणगीचा धनादेश स्विकारला. यावेळी अध्यक्ष .गिरीश चितळे कार्यवाह सुभाष कवडे,संचालक डी.आर.कदम,ज.कृ.केळकर ,हणमंत डिसले व महादेव जोशी सर्व सेवक व वाचक उपस्थित होते. या देणगीचा विनियोग निश्चितपणे वाचनालयाच्या चौफेर प्रगतीसाठी केला जाईल अशी ग्वाही कार्यवाह सुभाष कवडे यांनी दिली. यावेळी मा.मकरंद चितळे यांचे हस्ते राष्ट्र संत गाडगेबाबा यांचे जयंती निमित्त गाडगेबाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करणेत आले मा.गिरीश चितळे यांनी गाडगेबाबांच्या चरिञातीलकाही प्रसंग सांगितले याचवेळी दिशा फाॕऊन्डेशन भिलवडीचे श्री .सचिन देसाई यांनी वाचनालयास बालवाचकांचे वीस पुस्तके भेट दिली आहे.या बद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.ज.कृ.केळकर यांनी आभार मानले.