महाराष्ट्र
भोगावती कॉलेज कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी टी .एस. पाटील तर व्हाईस चेअरमनपदी एम.व्ही.पोवार यांची निवड

कोल्हापूरः अनिल पाटील
भोगावती कॉलेज प्राध्यापक व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. कुरुकली (ता.करवीर) च्या चेअरमन पदी प्रा.टी. एस. पाटील.( कावणेकर) तर व्हाईट चेअरमन पदी प्रा.एम.व्ही पोवार यांची बिन निवड करण्यात आली निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक सहकारी निबंधक श्रीमती एन.व्ही. वाडेकर होत्या.
यावेळी एन. के. बनसोडे, आर.ए. चौगले, दत्तात्रय दळवी, महादेव कांबळे, संदीप धामणे, शशिकांत पाटील, कुलदीप साळुंखे, संदिप पाटील,तानाजी पाटील, वसंत पाटील वंदना पाटील, वैशाली पाटील, धनाजी पाटील आदी उपस्थित हेहोते.
या वेळी मान्यवरांचे हस्ते नूतन चेअरमन,व्हा.चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.
स्वागत व प्रस्ताविक सचिव वसंत पाटील यांनी केले तर आभार संदिप चौगले यांनी मानले.