व्यसनाधीनतेपासून समाज दूर ठेवण्याची विद्यार्थ्यांची जबाबदारी : सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भगवान पालवे
नागठाणे येथील राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालय आणि सार्वजनिक मोफत वाचनालय नागठाणे यांच्या विद्यमानाने राजर्षी शाहू महाराज व पद्मभूषण नटसम्राट बालगंधर्व यांची जयंती साजरी : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाचे आयोजन

शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर विद्यार्थ्यांनी स्वतःचा,शाळेचा आणि आपल्या आई-वडिलांचा नावलौकिक करावा आणि व्यसनाधीनते पासून समाज कसा दूर राहील याची दक्षता विद्यार्थ्यांनी घ्यावी, तसेच ती विद्यार्थ्यांची जबाबदारी असणार आहे, असे प्रतिपादन भिलवडी पोलीस स्टेशनचे नूतन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे* यांनी नागठाणे ता. पलूस येथे व्यक्त केले.
*नागठाणे येथील राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालय आणि सार्वजनिक मोफत वाचनालय नागठाणे यांचे संयुक्त विद्यमानाने* साजरी करण्यात आलेल्या *राजर्षी शाहू महाराज व पद्मभूषण नटसम्राट बालगंधर्वांच्या जयंतीचे* औचित्य साधून प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे *अध्यक्षस्थानी ग्रामीण कथाकथनकार मा. श्री विजय जाधव* हे उपस्थित होते. त्यावेळी विजय जाधव सर यांनीही पद्मभूषण नटसम्राट बालगंधर्व यांच्या कार्याचा परिचय आपल्या भाषणातून व्यक्त केला.त्यावेळी *सार्वजनिक मोफत वाचनालयाच्या वतीने राबवण्यात आलेल्या उन्हाळी सुट्टी विद्यार्थी वाचक योजनेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्राचे वाटप* करण्यात आले. यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे *प्रास्ताविक व स्वागत सार्वजनिक मोफत वाचनालयाचे सचिव तथा राज्य तलाठी संघटनेचे कार्याध्यक्ष गौसमहंमद लांडगे* यांनी केले. यावेळी *बालगंधर्व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डी एम कारंडे सर,वाचनालयाचे अध्यक्ष अँड ओंकार पाटील* यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन श्री अधिक जाधव सर* यांनी केले तर *आभार वाचनालयाचे संचालक श्री भिकाजी साळुंखे पाटील* यांनी मानले या कार्यक्रमासाठी नागठाणेचे *सरपंच श्री विजय माने, पोलीस पाटील मा.दीपक कराडकर, राज्य द्राक्ष बागायतदार संघटनेचे श्री दिलीप आप्पा कुलकर्णी, जीवन विकास संस्थेचे सदस्य संपतराव पाटोळे बापू , कवी रमजान मुल्ला, वाचनालयाचे संचालक जयवंत मदने अशोक पाटील, सनी लटके , रघुनाथ पाटील,ग्रंथपाल प्रकाश लाड यांचे सह अनेक मान्यवर* उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना पोलिस निरीक्षक मा. भगवान पालवे यांनी *जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त* व्यसनमुक्तीची शपथ दिली.