महाराष्ट्र
सांगली येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

सांगली : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती सांगितली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात या कार्यक्रमास जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, उपजिल्हाधिकारी सर्वश्री राजीव शिंदे, दादासाहेब कांबळे, अजय पवार, श्रीमती सविता लष्करे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, तहसिलदार लिना खरात यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.