निराधार पेन्शन लाभधारकांना त्वरित द्यावी : सी.आर.सांगलीकर फौंडेशनची मागणी

मिरज : संजय गांधी निराधार पेन्शन,श्रावण बाळ निराधार पेन्शन,वृद्ध पेन्शन, विधवा परितकत्या निराधार पेन्शन या सारख्या विविध पेन्शन योजना शासनाच्या वतीने देण्यात येत आहेत. परंतु या पेन्शन लाभधारकांना गेली तीन महिने झाले शासनाकडुन पेन्शनच मिळाली नाही.लाभधारकांची उपजिवीका पेन्शनवरच अवलंबून असल्याने लाभधारकांच्यावरती सध्या उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत संबंधित अधिका-याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की लाभधारकांच्या कडून उत्पन्न,जात, अपंग आहे की नाही,असेल तर किती टक्के अपंगत्व आहे,आशा विविध प्रकारची माहिती मागीतली आहे. लाभधारकांनी अद्याप महीती दिली नसल्याने पेन्शन थांबली आहे.
परंतु सुरवातीलाच पेन्शन फाॅर्म भरते वेळी हि सर्व माहिती दिलेली असते तसेच खोटी माहिती असल्याचे सिद्ध झाल्यास योग्य ती कारवाई करण्यात यावी असे प्रतिज्ञापत्र लिहून घेतलेले असते.असे असुन ही प्रत्येक वेळी अशा प्रकारची माहिती मागीतल्याने लाभधारकांना आर्थिक फटका बसून त्यांची कुचंबणा होत आहे.
तरी संबंधित निराधारांना दरमहा वेळेवर पेन्शन देऊन शासनाने त्यांना आधार द्यावा हि विनंती.अशा मागणीचे निवेदन सी.आर.सांगलीकर फौंडेशन च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे मा.तहसिलदारसो अमोल कुंभार यांना देण्यात आले.
यावेळी सी.आर.सांगलीकर फौंडेशनचे नझीर झारी,सचिन इनामदार, स्वप्निल शिवशरण, जुबेर पटेल,राहील मुल्ला, अमन इनामदार, जयसिंग साळुंखे, सलिम अत्तार,सय्यद खतिब आदी उपस्थित होते.