महाराष्ट्र

वनक्षेत्रपाल प्रशिक्षणार्थींचा 18 रोजी कुंडल येथे दिक्षांत समारंभ

 

सांगली : कुंडल विकास प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी (वने) कुंडल येथे वनक्षेत्रपाल प्रशिक्षणार्थी सत्र 2022-2024 ची पासिंग आऊट परेड व दिक्षांत समारंभ दि. 18 जून 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत संपन्न होत आहे, अशी माहिती कुंडल विकास प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी (वने) चे संचालक बी. बी. शिंदे यांनी दिली.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एम.एस. पुणे चे मुख्य वनसंरक्षक (शिक्षण व प्रशिक्षण) एन. आर. प्रविण उपस्थित राहणार असून हा कार्यक्रम मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर आर. एम. रामानुजम यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

कुंडल विकास प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी (वने) कुंडल येथे वनशिक्षा निदेशालय देहरादून यांच्याकडून नामनिर्देशित करण्यात आलेल्या नवनियुक्त वनक्षेत्रपाल यांचे 18 महिने कालावधीचे 10 वे प्रशिक्षण सत्र दि. 19 डिसेंबर 2022 पासून सुरू आहे. या प्रशिक्षणाकरिता केरळ, पश्चिम बंगाल व जम्मू काश्मिर या राज्यातील एकूण 42 प्रशिक्षणार्थी उपस्थित आहेत. हे प्रशिक्षण सत्र दि. 18 जून 2024 रोजी समाप्त होत असल्याचे श्री. शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!