महाराष्ट्रआरोग्य व शिक्षण

सांगली येथे डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टी दिन सप्ताह ‍निमित्त सिव्हील हॉस्पीटल मध्ये विविध कार्यक्रम  

 

          सांगली : डॉ. रामचंद्र भालचंद्र यांचा 10 जून जन्म दिवस व मृत्यु दिवस डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टी दिन सप्ताह साजरा करण्यात येतो. या निमित्ताने पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे नुकतचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया पाटीलजिल्हा नेत्र कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. गायत्री वडगावेशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. शैलजा सिन्नमजिल्हा नेत्र नोडल अधिकारी जगन्नाथ बाबरनेत्र चिकित्सा अधिकारी रमेश कोथळेरोहित चौगुले, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. साकेकर, डॉ. सुर्यवंशी, डॉ. चौधरी नेत्र समुपदेशक अविनाश शिंदे आदी उपस्थित होते.

      दृष्टीआडची सृष्टी दाखविणारे डॉ. रामचंद्र भालचंद्र यांचा जन्म दिवस व मृत्यु दिवस 10 जून आहे. डॉ. रामचंद्र भालचंद्र यांनी त्यांच्या जवळजवळ 25 वर्षाच्या कारकिर्दीत 90 हजाराहून अधिक शस्त्रक्रिया केल्या. ते सामान्य जनतेत देवमाणूस म्हणून ओळखले जातत्यांनी हैद्राबाद येथील मेडीकल कॉलेजमध्ये एम.बी.बी.एस चे शिक्षण पूर्ण केले नंतर मुंबई विद्यापीठाचे एम. एस. डी. ओ. एम. एस. चे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून अनेक वर्षे काम पाहिले. याच काळात ते एक नावाजलेले नेत्रतज्ञ म्हणून प्रसिद्ध झाले. डोळ्याच्या शस्त्रक्रियेची शिबीरे आयोजीत केली व अंध व्यक्तींना दृष्टी देण्याचे काम केले असल्याचे डॉ. छाया पाटील यांनी यावेळी सांगितले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नेत्र समुपदेशक अविनाश शिंदे यांनी तर आभार अभिनंदन पाटील यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!