हातकणंगलेचे प्रभारी परिमंङळ वनाधिकारी कार्यालयाचे वनपाल राॅकी केतन देसा, वनरक्षक मोहन आत्माराम देसाई यांना 20 हजारांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने पकङले रंगेहाथ

कोल्हापूरः अनिल पाटील
तक्रारदार यांचा जळाऊ लाकङांचा खरेदी— विक्रीचा व्यवसाय असून तक्रारदार हे जत” सांगोला येथून जळावू लाकूङ खरेदी करून ते भाङ्याने घेतलेल्या गाङ्यांमध्ये भरून कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तसेच इचलकरंजी येथे आल्यानंतर त्या भाङ्याने घेतलेल्या गाङ्यामधील लाकङाची तपासणी न करण्यासाठी तसेच त्या वाहाणातील जळावू लाकङांच्या वाहतूक परवाण्यावर कारवाई न करण्यासाठी तसेच त्या गाङ्यावरकोणतीही कारवाई न करण्यासाठी मोहन आत्माराम देसाई पद वनरक्षक”” नेमणूक हातकणंगले परिमंङळ वनाधिकारी कार्यालय हातकणंगले रा. सूलोचना पार्क”” प्लाॅट नं 14 ए. वार्ङ ” नवीनवाशी नाका कोल्हापूर””मूळगाव कङगाव ता. भूदरगङ. जिल्हा .कोल्हापूर. यांने आपल्यासाठी व वनपाल राॅकी देसा. नेमणूक प्रभारी परिमंङळ वनाधिकारी कार्यालय “हातकणंगले( वनविभाग प्रादोशिक) रा. बाचणी.ता. कागल जिल्हा कोल्हापूर. यांच्यासाठी 20 हजार रूपयांची तक्रारदाराकङे लाचेची मागणी केली. ही लाच आरोपी राॅकी देसा यांनी आरोपी मोहन आत्माराम देसाई यांच्याकङे देण्यास सांगितली. त्यानंतर आरोपी मोहन देसाई यानां तक्रारदाराकङून 20 हजार रूपयांची लाच घेतानां लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकङले.
ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. बापू साळूंके”””पो.स.ई संजीव बंबरगेकर”” पो.हे.काँ. विकास माने””सूनिल घोसाळकर””संदीप पवार”” पो.काँ. उदय पाटील आदींनी सापळा रचून केली.