मिरज येथे रोजा इफ्तार निमित्त जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांनी रमजान महिना, ईदच्या हिदू मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा

दर्पण न्यूज मिरज :– मिरजेत हिंदू मुस्लिम एकतेची परंपरा अखंड,हिंदू मुस्लिम युवा मंच तर्फे रोजा इफ्तार,जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांनी रमजान महिना आणि ईदच्या सर्व हिदू मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या ,
रमजान मे राम दिवाली मे अली, हा हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदु मुस्लिम एकता मंच, मा. समित (दादा) कदम युवा मंच, जनसुराज्य युवा शक्ती, समीर मालगावे मित्र परिवार तर्फे आज महाराष्ट्र लॉन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी विधान परिषदेचे आमदार इद्रिस भाई नायकवडी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे प्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर विनोद परमशेट्टी, डॉ रियाज मुजावर, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे सतीश शिंदे पोलीस निरीक्षक अजित सिद ,सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे,मुन्ना कुरणे, महादेव अण्णा कुरणे डॉ महेश कुमार कांबळे समिर मलगावे यांच्यासह हिंदू मुस्लिम बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज समित दादा कदम यांनी आमदार इद्रिस नायकवडी यांना खजूर भरवून रोजा इफ्तार केला मिरज नगरी ही हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असून समित दादा कदम यांनी रमजान महिना आणि रमजान ईदच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनीही यावेळी हिंदू मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमामुळे उपस्थित सर्व हिंदू -मुस्लीम बांधवांनी समाधान व्यक्त केले.