महाराष्ट्रक्राईम

कागल तहसिलदार कार्यालयातील अव्वल कारकून आश्र्विनी कारंङे यानां 30 हजार रूपयाची लाच घेतल्या प्रकरणी 15 दिवसांची न्यायालयीन कोठङी

 

कोल्हापूरः अनिल पाटील

– तक्रारदार हे गौण खनिज खरेदी विक्री चा व्यवसाय करीत असून त्यांनी भाडे करारवरती कागल तालुक्यात जमीन घेतली असून ही जमीन एन ए करणेकरिता त्यांनी तहसील कार्यालय कागल येथे मुळ मालकाचे वतीने अर्ज केला होता . या जमिनीच्या एन” ए करण्याकरिता तक्रारदार यांचेकडे श्रिमती अश्विनी अतूल कारंडे “वय 46 पद अव्वल कारकून “तहसिल कार्यालय कागल वर्ग —3 रा. शाहूपूरी कोल्हापूर यांनी तक्रारदार यांचेकडे स्वतः करीता 60,000/- रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी 30,000/- रुपये लाच रक्कम घेऊन येण्यास सांगितले त्यानंतर मागणी केलेप्रमाणे कारंडे यांनी तक्रारदार यांचेकडून 30,000/-रुपये लाच रक्कम स्वीकारताना त्यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी यांचेविरुद्ध कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज त्यानां न्यायालयासमोर हजर केले असता 15 दिवसाची न्यायालयीन कोठङी देण्यात आली.
ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक सरदार नाळे
यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती आसमा मुल्ला पोलीस निरीक्षक
सपोफो / श्री प्रकाश भंडारे पोहेकॉ / श्री अजय चव्हाण
पोना / सुधीर पाटील, आदीनी केली होती.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!