सार्वजनिक वाचनालय भिलवडी संस्थेचा 85 वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे 12 मे 2025 रोजी सार्वजनिक वाचनालय भिलवडी या संस्थेचा 85 वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात झाला.
यावेळी सुप्रसिद्ध साहित्यिक आणि वाचनालयाचे कार्यवाह श्री सुभाष कवडे यांनी एक सर्वांसाठी आदर्शवत असा उपक्रम राबविला. त्यांनी आजवर दीड वर्षात मिळालेल्या विविध पुरस्काराची आणि विविध कार्यक्रमांच्या मानधनाची रक्कम रुपये 25000 चा धनादेश वाचनालयास देणगी म्हणून अध्यक्ष गिरीश चितळे यांच्याकडे सुपूर्त केला. गतवर्षी म्हणजे एक जानेवारी 2024 रोजी सरांनी माझ्याजवळ मला मिळालेले सर्व पुरस्कार आणि कार्यक्रमाचे मानधन वाचनालयास देणगी देण्याचा संकल्प व्यक्त केलेला होता. यावेळी सरांनी वाचनालयामुळे मला महाराष्ट्रात ओळख मिळाली आहे. वाचनालय माझा श्वास आहे. आनंदाचे ठिकाण आहे. जगण्याची प्रेरणा आहे. अशा भावना व्यक्त केल्या आणि आपला संकल्प पूर्ण केला. कवडे सरांचा हा उपक्रम सर्वांनाच आदर्श प्रेरणादायी आहे असे मला वाटते. या उपक्रमाबद्दल वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांनी कवडे सरांचे विशेष कौतुक व आभार मानले.