ज्येष्ठ साहित्यिक कवी सुभाष कवडे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा बालकुमार साहित्यसेवेचा बाबूराव शिरोळे पुरस्कार जाहीर

भिलवडी- महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या ११८ वर्ष साहित्य क्षेत्रात कार्यकरीत असलेल्या आद्य साहित्य संस्थेचा बालकुमार साहित्य सेवेबद्दलचा शांतादेवी आणि बाबुराव शिरोळे पुरस्कार भिलवडीचे सुप्रसिद्ध साहित्यिक सुभाष कवडे यांना जाहीर झाला आहे पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र कार्याध्यक्ष मिलिंद जोशी व प्रमुख कार्यवाहक सुनिताराजे पवार यांनी पाठविले आहे २०२३ सालासाठीचा हा पुरस्कार असून पुरस्काराचे वितरण रविवार दि.२६ मे २०२४ रोजी साहित्य आकादमीचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक माधव कौशिक यांचे हस्ते व जेष्ठ विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे यांचे अध्यक्षतेखाली पुणे येथे एस.एम.जोशी फौंडेशन सभाग्रहात समारंभ पूर्वक प्रदान करण्यात येणार आहे
सुभाष कवडे यांची १५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यातील ४ पुस्तके बालकुमार वाड:मय प्रकारातील आहेत गंमतगाणी (बालकविता) हिरवी हिरवी झाडे (बालकविता) संस्कार शिदोरी (बालकथा )श्यामची आईपुस्तकातील संस्कार धन(संपादन) हि त्यांची बालकुमारांसाठी गाजलेली पुस्तके आहेत सार्वजनिक वाचनालय भिलवडी आणि साने गुरुजी संस्कार केंद्र भिलवडी या माध्यमातून गेली २३ वर्ष शी.सुभाष कवडे बालकुमारांसाठी विविध उपक्रम सातत्याने राबवीत आहेत वाचन वर्ग वाचन लेखन कार्यशाळा पुस्तक वाचन स्पर्धा ,शिबिरे,बाल वाड:मय प्रदर्शने बाल कुमारासाठी व्याख्यानमाला आदी उपक्रम राबवीत आहेत सुमारे ५ हजार पालकांपर्यंत त्यांनी श्यामची आई पुस्तके पोहोचवली आहेत आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व बालकुमार साहित्य संमेलनात त्यांचा बऱ्याच वेळा सहभाग राहिला आहे बालकुमारांसाठी त्यांचे व्ययक्तिक ग्रंथालय असून बालकुमारांसाठी मोफत पुस्तके दिली जातात बालकुमारांसाठी त्यांचे ऑडीओ बुक आहेत प्रसिद्ध कवी ललित लेखक वक्ते वृत्तपत्रीय स्तंभ लेखक साहित्य संमेलनांचे सयोजक म्हणून ते महाराष्ट्र भर सुपरिचित आहे औदुंबर संमेलनात त्यांचे नेहमीच योगदान असते पुरस्काराचे स्वरूप शाल,श्रीफळ,सन्मानपत्र व रोख रक्कमअसे आहे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मान्यवरांकडून अभिंनंदन करत आहे.