देशात प्रथमच सांगली येथे”टेलर्स एक्स्पो 2024″ आयोजन : अध्यक्ष बसवराज पाटील उर्फ सीयाराम पाटील
टेलर वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांचा पुढाकार : बैठकीत एकमताने ठराव

सांगली : टेलर वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील टेलर व्यावसायिक आणि ग्राहकांसाठी देशात प्रथमच “टेलर्स एक्स्पो 2024” आयोजन करण्यात येणार आहे, या बाबत महाराष्ट्र राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, अशी माहिती टेलर वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बसवराज पाटील उर्फ सीयाराम पाटील दिली.
बसवराज पाटील म्हणाले, की महाराष्ट्र राज्यातील नव्हे तर देशभरात नव्या दमाने टेलर व्यवसाय वाढत आहे आधुनिक युगामध्ये आपल्या टेलर व्यवसायातील ग्राहकाला चांगल्या सुविधा देण्याचा आमचा मानस आहे. तसेच येणाऱ्या काळात टेलरच्या अडचणी समजून घेत टेलर लोकांचा कसा व्यवसाय वाढीस लागेल याकडे आमची वाटचाल सुरू आहे. त्यासाठी सांगलीमध्ये आम्ही धूमधडाक्यात एकाच छताखाली टेलर व्यवसायातील आधुनिकतेच्या सुविधांचा आणि वेगवेगळ्या कपडे डिझाईन आणि इतर गोष्टींचा ग्राहकांना आणि टेलर व्यवसायिकांना लाभ व्हावा यासाठी लवकरच “टेलर एक्स्पो 2024″ चे आयोजन करणार आहे. यामध्ये सांगलीतील तमाम लोकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या टेलर एक्स्पो 2024” चा सांगली जिल्ह्यातील शेकडो लोकांना लाभ होणार आहे
सांगली येथील आयोजित बैठकीमध्ये टेलर वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे पदाधिकारी यांनी स्टॉल कसे असावेत तसेच इतर गोष्टींचा कसा समावेश असावा याबाबत चर्चा केली लवकरच यासाठी एक दिलाने काम करण्याचे ठरविले.
या बैठकीस टेलर वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष बसवराज पाटील उर्फ सीयाराम पाटील शशिकांत खोपार्डे व राज्यातील विविध ठिकाणचे पदाधिकारी उपस्थित होते.