दुधोंडी येथे 1 मे रोजी मानसिंग बँकेच्या वर्धापन दिनाचे आयोजन : सुधीर (भैय्या) जाधव

दुधोंडी (प्रतिनिधी):-
दुधोंडी ता पलुस येथे दि. १ मे २०२४ रोजी मानसिंग बँकेच्या वर्धापन दिन साजरा करीत आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मा. सुधीर (भैय्या) जाधव यांनी दिली.
यावेळी बोलताना बँकेचे चेअरमन मा.सुधीर (भैय्या) जाधव यांनी सांगितले की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्रात विलक्षण कामाने स्वतःची आगळी ओळख निर्माण करणारी अर्थसंस्था म्हणजे मानसिंग को-ऑप. बँक आहे.
कृष्णाकाठी वसलेल्या दुधोंडी (जि. सांगली) सारख्या आडवळणी छोटेखानी गावात मा. जे. के. (बापू) जाधव यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लोकांना सोबत घेऊन सव्वीस वर्षापूर्वी मानसिंग बँकेची स्थापना केली. गावखेड्यातील शेतकरी, कामगार, छोट्या उद्योजकांसह
सामान्य माणसाची आर्थिक नड निघावी आणि त्यांच्या वेळेची बचत व्हावी म्हणून बापूंनी बँकेसारखी वित्तीय संस्था सुरु केली.
आज दुधोंडीसह सांगली, पलूस, विटा, कराड, येथे
बँकेच्या शाखांचा विस्तार झाला आहे.
मा.जे.के. बापूंनी सहकाऱ्यांना बरोबर घेऊन सुरुवातीला गावाच्या आणि नंतर परिसराच्या उत्कर्षासाठी विविध सहकारी संस्थांची स्थापना केली.
बँक, दुध उत्पादन,जलसिंचन, पतसंस्था महिला विकास सोसायटी, शेतीमाल प्रक्रिया, ज्ञानप्रबोधनी,
ग्रामविकास प्रतिष्ठान, ग्रामविकास सोसायटी, अशा अनेकविधी सहकारी संस्थांचे जाळे विणत जे. के. बापू आज सांगली जिल्ह्यातील एक लाख कुटुंबापर्यंत केवळ आपल्या लोककार्यातून पोहोचले आहेत. हे केवळ लोकांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच शक्य झाले आहे.
जनसामान्य जनतेच्या आणि सभासदांच्या विश्वासाला सार्थ ठरवणाऱ्या बापूंच्या व्यापक दृष्टीकोनाचा आणि सातत्यपूर्ण परिश्रमाचा नेहमीच बँकेला फायदा होत आला आहे.
आज बँक यशस्वीपणे २७ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. बँकेच्या यशाचे गोडकौतुक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले
तेव्हा दि. १ मे २०२४ रोजी मानसिंग बँकेच्या वर्धापन दिनानिमित्तसत्यनारायणाची पूजा होत आहे. तरी या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमास सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि हितचिंतक यांची उपस्थिती राहावे असे आवाहन चेअरमन सुधीर (भैय्या) जाधव यांनी केले