कृषी व व्यापारग्रामीणमहाराष्ट्र

खते, बियाणे, कीटकनाशकांची तपासणी करा : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

 

       दर्पण न्यूज सांगली : : कृषि विभाग व जिल्हा परिषद कृषि विभागामधील अधिकारी यांनी कार्यक्षेत्रातील खते, बियाणे व कीटकनाशके यांच्या निविष्ठा विक्री केंद्रांची तसेच निविष्ठा व संजीवके यांच्या उत्पादन स्थळांची 100 टक्के तपासणी करावी. तपासणी करताना अनियमितता आढळून आल्यास मार्गदर्शक सूचनानुसार कायदेशीर कारवाई करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, कृषी विकास अधिकारी, मोहीम अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती यांची रब्बी हंगाम नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीत विविध खते व बियाणे उपलब्ध होण्याबाबतचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या खताची कमतरता नाही. रासायनिक खतांच्या उपलब्धतेबाबत शेतकऱ्यांना माहितीसाठी प्ले स्टोअर वरील कृषक या अॅप वर दर दिवशीचा तालुकानिहाय व कृषि सेवा केंद्र निहाय साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामामध्ये काही तक्रारी असल्यास तालुका कृषि अधिकारी कार्यालयात तक्रार निराकरणासाठी भेटी द्याव्यात. तक्रार करण्यासाठी 18002334000 या टोल फ्री  क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कृषक अॅप वापरण्याची कार्यपद्धती-   प्ले-स्टोअर – कृषक अॅप – चावडी – खत उपलब्धता- जिल्हा- तालुका –  तालुक्यातील कृषि सेवा केंद्र निहाय उपलब्ध खत साठा दिसेल. तालुकानिहाय व ग्रेडनिहाय साठा – मे.टन मध्ये पुढीलप्रमाणे –

 

अ.क्र तालुका युरिया डी.ए.पी एम.ओ.पी एन.पी.के.एस एस.एस पी
आटपाडी ९२३.८२१ ५३.८५ ७१.७ ३६८.५ २७७.१५
जत १३५१.३४५ २००.३ १९५.९ १०४०.५ ८०२.४५
कडेगाव ६१६.५९८ १७२.९५ ३९१.२ १६४२.०५५ ७४४.७५
क.महांकाळ ३१०.३३२ ६८.८२५ ११२.८ ६३७.८७ ४१८.९९
खानापूर ३५४.८२ ७५.६ १६६.१ ६९३.२२५ ४९५.९५
मिरज ७१२.२६६ १७५.८५ ४०८.८३ १७९५.४२८ ११३५.४२५
पलूस ५०३.८३२ ५३.१ २६८.३५ १०३७.४२५ ५४१.३७५
शिराळा ३७५.१७५ २०.१५ ११५.८ ५१६.२३५ ३२७.६५
तासगाव ६५५.१९८ १०८.६५ २७६.८५ ११५४.७७ १०००.५
१० वाळवा ११९५.६९८ २५४.५५ ७३२.२३ २९२७.६२ १०८५.६१
एकूण ६९९९.०८५ ११८३.८२५ २७३९.७६ ११८०४.६२८ ६८२९.८५

00000

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!