सुधीर (भैय्या) जाधव यांचा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडून राजीनामा नामंजूर

पलूस प्रतिनिधी:- सांगली लोकसभा तिकीट वाटपासाठी इंडिया आघाडी कडून बरीच खलबते झाली शेवटी महाविकास आघाडी कडून शिवसेनेला तिकीट सोडण्यात आले याचे पडसाद म्हणून सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र चालू केले होते यामध्ये मानसिंग को ऑप बँकेचे चेअरमन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे महासचिव सुधीर भैय्या जाधव यांनी सुद्धा आपला राग व्यक्त करुन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव पदाचा राजीनामा काही दिवसापूर्वी दिला होता.*
*पण तो राजीनामा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी नामंजूर करण्यात आले आहे असे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.*
*त्यानी दिलेल्या पत्रामध्ये असे म्हंटले आहे की आपल्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची गरज काँग्रेस पक्षाला आहे, आणि आपण काँग्रेस पक्षाचे विचार सर्वसामान्य कार्यकर्ता यांच्या पर्यंत पोहचवण्याचे काम महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार विश्वजीत उर्फ बाळासाहेब कदम यांच्या मार्गदर्शनाने केलेले आहे, आणि आपण आहे त्या पदावर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे महासचिव आहातच आणि कोल्हापूर जिल्हा शहर युवक काँग्रेस चे प्रभारी म्हणूनही आपली नियुक्त आहे तशी ठेवण्यात आली आहे त्यामुळे आपण आपले काम करुन दाखवावे असे पत्राद्वारे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी ते पत्र दिले आहे आहे.