राधानगरी तालुक्यातील बुरंबाळी येथे क्रिकेटच्या सामन्यातील राग मनात धरून झालेल्या मारहाण प्रकरणी 10 ते 12 मुलांच्या वर गुन्हा दाखल

दर्पण न्यूज कोल्हापूर :- अनिल पाटील
राधानगरी तालुक्यातील बुरंबाळी येथील उत्तम बळवंत गुरव व 19 राहणार तळगाव तालुका राधानगरी हा बुरंबाळी गावातील विठ्ठल मंदिरासमोर रस्त्यालगत वैयक्तिक साम्राज्य स्पोर्ट्स बुरंबाळी येथे सकाळी झालेले भांडण मिटवूया असे सांगून त्यांना बोलावून घेऊन कात्रेवाडी या ठिकाणी झालेल्या क्रिकेटच्या सामन्यातील राग मनामध्ये ठेवून त्याला लाकडी दांडके व लोखंडी पाईपने त्याला व त्याचे मित्र शुभम सुतार योगेश मालप समाधान पाटील यांना मारहाण केली ही घटना आज सकाळी सह्याद्री हायस्कूल धामोड व सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विठ्ठल मंदिराच्या समोर घडली
याप्रकरणी प्रणव विलास मगदूम, वेदांत राहुल पाटील, आयर्न कृष्णात कांबळे, कुणाल कृष्णात कांबळे,विघ्नेश दत्तात्रय हुजरे,प्रशांत चौगुले राहणार राशिवडे,,,, राहुल दत्तात्रय पाटील,, स्वप्निल बळवंत कांबळे व इतर दहा ते बारा मुले सर्व बुरंबाळी तालुका राधानगरी यांच्यावर राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे
या घटनेचा तपास स. पो. नी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो. स. ई भोसले करत आहेत.



