भिलवडी जायन्ट्सकडून मतदार जागृती अभियान : लोकांचा उत्स्फूर्त सहभाग
पलूसचे बीडीओ अरविंद माने यांच्याकडून उत्कृष्ट मार्गदर्शन

भिलवडी:; लोकशाही हाच भक्कम राष्ट्राचा पाया हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सामाजिक जाणीवेतून जायंट्स ग्रुप भिलवडीने चितळे डेअरी, सार्वजनिक वाचनालय, जायन्ट्स सहेली, व्यापारी संघटना त्यांच्यासह मतदार जागृती अभियान राबवले.
उद्योजक गिरीश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली जायन्ट्सचे अध्यक्ष सुबोध वाळवेकर यांनी कै. बाबासाहेब चितळे सांस्कृतिक भवन शिवाजीनगर माळवाडी या ठिकाणी बुधवार दिनांक 24 एप्रिल रोजी आठवडा बाजाराचे औचित्य साधून लोकांमध्ये मतदानाची जागृती केली. टक्केवारी वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवला . यावेळी पलूस तालुक्याचे बीडीओ अरविंद माने यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.मतदान वाढीसाठी शासन स्तरावरील विविध उपक्रमांची माहिती दिली.उद्योजक गिरीष चितळे म्हणाले की मतदान हा नुसता अधिकार नसून ते कर्तव्य आहे . यावेळी जायंट्सचे उपाध्यक्ष महावीर चौगुले, जगन्नाथ माळी, डॉ. जयकुमार चोपडे, लेखक कवी सुभाष कवडे सर, बाळासो महिंद , प्रदीप माने, रोहित रोकडे, रणजीत पाटील, डी आर कदम, दादा चौगुले, बाहुबली चौगुले, सुनील परीट, पार्श्वनाथ चौगुले,व्यंकोजी जाधव,संतोष जाधव, राजीव कदम, विनायक चौधरी,के आर पाटील,भाग्येश चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
सुभाष कवडे सर यांनी सर्वांना मी मतदान करणारच म्हणून शपथ दिली. सर्व उपस्थित मान्यवरांनी डिजिटल बोर्ड वरती स्वाक्षरी करून मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा मानस व्यक्त केला. जायन्ट्सचे अध्यक्ष सुबोध वाळवेकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.