कोरेगाव येथे उद्योगपती सी आर सांगलीकर यांना आधुनिक युगातील सम्राट अशोक पुरस्काराने सन्मानित
महाराष्ट्र राज्यासह अनेक राज्यांतून उद्योगपती सी आर सांगलीकर यांचे कौतुक अन् अभिनंदन

सांगली:सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील तक्षशिला बुद्ध विहार बहुउद्देशीय सामाजिक संस्था, डी.पी.भोसले कॉलेज व स्कॉलर्स स्टुडन्ट युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेल्या कार्यक्रमात सांगली जिल्ह्यातील गुगवाड (ता. जत) येथे धम्मभूमी बौद्ध विहारची उभारणी केल्याबद्दल दिलदार व्यक्तिमत्व मा उद्योगपती सी आर सांगलीकर यांना आधुनिक युगातील सम्राट अशोक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्र राज्यासह अनेक राज्यांतून उद्योगपती सी आर सांगलीकर यांचे कौतुक अन् अभिनंदन करण्यात येत आहे.
महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष पुरस्कार वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहत धम्मबांधवांशी संवाद साधला. यावेळी आयोजकांनी माझ्या धम्म कार्याची दखल घेत *”आधुनिक युगातील सम्राट अशोक”* हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. यावेळी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. रमेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सुदाम खरात (महाराष्ट्र राज्य पेन्शन असोसिएशन), सी. आर. बर्गे, संजय कर्पे, अनिल जाधव, मिलिंद माने, प्रणव बर्गे, पूनम गायकवाड, महेंद्र खराटे, डॉ. विजया भालेराव यांची सन्माननीय उपस्थिती होती. यावेळी प्रा.डॉ. बाळासाहेब संतू चव्हाण, डॉ. शिवाजीराव पांडुरंग कांबळे, डॉ. मिनाताई रमेश इंजे, डॉ.भिमराव शंकर बुधकर, राजेंद्र बाळासाहेब जावळे, महारुद्र कडाची तिकुंडे, शर्मिला आबासाहेब आवाडे आदींचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.