गजानन विद्यालय, आरळेची सान्वी घाटगे हिचा वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक
श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना पुरस्कृत, श्री वारणा विभाग सत्कार्य संवर्धक मंडळ आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, वारणानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

दर्पण न्यूज वारणानगर (प्रतिनिधी) : गजानन विद्यालय, आरळे येथील इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी कु. सान्वी अभिजीत घाटगे हिने वारणानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागीय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
ही स्पर्धा श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना पुरस्कृत, श्री वारणा विभाग सत्कार्य संवर्धक मंडळ आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, वारणानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
सान्वी घाटगे हिने प्रभावी आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली. तिच्या या यशामुळे गजानन विद्यालयाच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
बक्षीस वितरण समारंभ वारणानगर येथील शेतकरी भवनमध्ये पार पडला. या समारंभात कुरूप पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विक्रम पाटील, कथाकथनकार जयवंत आवटी, वाले साहेब, एस. एन. खाडे सर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सन्माननीय साहित्यिक तसेच वारणा उद्योग समूहाचे पदाधिकारी यांच्या हस्ते सान्वीला सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी सान्वी घाटगे हिच्या भाषणाचे पुन्हा एकदा सादरीकरण करण्यात आले.
या यशामागे गजानन विद्यालयाचे पदवीधर अध्यापक श्री संभाजी बोने सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. संस्थापक अध्यक्ष आनंदराव घाटगे (भाऊ), तज्ञ संचालक अभिजीत घाटगे (भैय्या), सौ. अश्विनी घाटगे मॅडम, मुख्याध्यापिका सौ. माधुरी घाटगे मॅडम, सर्व शिक्षकवृंद, तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचेही सान्वीला मोलाचे प्रेरणा व पाठबळ मिळाले.