भिलवडी येथे भिलवडी काँग्रेस कमिटीच्या वतीने उद्या सांगली सहकारी साखर कारखान्यांचे नूतन संचालकांचा सत्कार
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड यांची उपस्थिती

दर्पण न्यूज भिलवडी : भिलवडी काँग्रेस कमिटीच्या वतीने सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड यांच्या हस्ते डॉ वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना सांगली च्या आणि क्रांती अग्रणी जी डी बापू लाड सहकारी साखर कारखाना कुंडल च्या संचालक पदी बिनविरोध निवड झालेल्या स़ंचालकांचा सत्कार करण्यात येणार आहे. सत्कार शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता भिलवडी काँग्रेस कमिटी कार्यालय येथे होणार आहे.
या सत्कार मूर्ती मध्ये डॉ वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना सांगलीचे बिनविरोध संचालक
यशवंत उर्फ राजू दादा पाटील, अमित पाटील, प्रल्हाद गडदे ऋतुराज सूर्यवंशी, गणपतराव सावंत तसेच क्रांती अग्रणी जी डी बापू लाड सहकारी साखर कारखाना कुंडलचे संचालक विजय पाटील यांचा सहभाग आहे.भिलवडी आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भिलवडी काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.