महाराष्ट्र
ज्येष्ठ समाजसेविका सुमनताई गायकवाड यांना अंकलखोप येथील राजेश चौगुले फौंडेशन कडून “नारीशक्ती जिवनगौरव” पुरस्काराने सन्मानित

भिलवडी; ज्येष्ठ समाजसेविका सुमनताई गायकवाड यांना अंकलखोप येथील
राजेश चौगुले फौंडेशन कडून त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल “नारीशक्ती जिवनगौरव” पुरस्काराने सन्मानित करणेत आले. हा पुरस्कार प्रसिद्ध डाॕक्टर.निलीमा लिमये, फौडेशनच्या अध्यक्षा शितल चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये समाजसेविका प्रा. कविता म्हेत्रे यांचे हस्ते प्रदान करणेत आला याप्रसगी फौंडेशनचे संस्थापक राजेश चौगुले,अंकलखोपच्या सरपंच राजेश्वरी सावंत,संतगाव च्या सरपंच सुखदा सावंत, विद्या पाटील, कुंभार सर सचिव सचिन चौगुले, उपसरपंच सुरैय्या तांबोळी, कुंडलच्या माजी सरपंच तथा मनिषाताई लाड,संगिता जोशी, दिपाली कुंभार,सुजाता गायकवाड,संगिता यादव, आदी उपस्थित होते.