सांगली/भिलवडी : सांगली लोकसभेसाठी मी विशाल पाटील यांच्यासाठी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून आग्रह धरला होता. सांगलीची जागा काँग्रेस पक्षाची आहे, तो आमचा हक्क आहे, मागणी आहे, ती मागणी अजिबात सोडणार नाही, मी विशाल पाटील यांना मदत करणार. मी ठरवलं की मनापासून तर जग इकडचं तिकडे होऊ दे, मी शब्दाचा पक्का माणूस आहे , हिच माझी ओळख आहे , हिच पतंगराव कदम साहेबांची ओळख होती, एकदा शब्द दिला की तो पाळायचा,असे प्रतिपादन माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी एका पत्रकार परिषदेत केले.