वाचन चळवळ वाढीसाठी चितळे उद्योगसमूह सहकार्य करणार : उद्योगपती मकरंद चितळे
भिलवडी वाचनालयात पुस्तक प्रदर्शन : लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील
स्व.काकासाहेब चितळे यांचे समरणार्थ सुवर्ण महोत्सवी वाचन कट्टा समारंभा निमित्त भिलवडी सार्वजनिक वाचनालयात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.चितळे डेअरी चे संचालक व उद्योगपती मकरंद चितळे व सौ.भक्ती चितळे यांच्या हस्ते ग्रंथपूजन करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
काकासाहेब चितळे यांनी सुरू केलेली वाचन चळवळ वृध्दींगत करण्यासाठी चितळे उद्योगसमूह सर्वोतोपरी सहकार्य करेल असे आवाहन मकरंद चितळे यांनी केले.
सौ.भक्ती चितळे म्हणाल्या की,बालवयातच मुलांवर वाचन संस्कार रुजविल्यास वाचन संस्कृती वृध्दिंगत होईल.
गिरीश चितळे म्हणाले की,भिलवडी सार्वजनिक वाचनालयात डिजिटल पुस्तक भिंत हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.
मकरंद चितळे,भक्ती चितळे, पुस्तकवाले पुणे यांचा वाचनालयाच्या वतीने ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक व स्वागत वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे यांनी केले.जयंत केळकर यांनी आभार मानले.
सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे, पुस्तकवाले पुणेचे ऋतिका वालंबे, आशय वलांबे
वाचनालयाचे संचालक भू.ना.मगदूम,जयंत केळकर, ए.के.चौगुले, डी.आर.कदम, डॉ.जयकुमार चोपडे, बी.डी.पाटील,महावीर चौगुले,शशिकांत कुलकर्णी,भगवान शिंदे,संजय कदम,प्रदीप शेटे,व्यापारी संघटनेचे रमेश पाटील,सुबोध वाळवेकर,प्रमोद कुलकर्णी,बापू जोशी,सुकुमार किणीकर,संजय पाटील, अभिजीत रांजणे, घनश्याम मोरे,दत्ता उतळे,शरद जाधव,संजय तावदर,वामन कटिकर आदी उपस्थित होते.